मुंबई | कोरोनाचे रूग्ण राज्यात वाढतायत. कोरोनाचे रूग्ण खाजगी आणि सरकारी रूग्णालयात उपचार घेतायत. मात्र अनेक ठिकाणी खाजगी रूग्णालयांमध्ये मनमानी बिलांची वसूली करण्यात येते. अशी प्रकरण आढळल्यास कारवाईचे आदेश एकनाश शिंदे यांनी दिले आहेत.
कोरोना रुग्णांकडून मनमानी बिलांची वसुली करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करा असे आदेश मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना दिले असल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ही वेळ एकमेकांना मदत करण्याची असून कुणी गैरफायदा घेत असेल तर खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला .
मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्ग आणि पालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन, महापौर ज्योत्सना हसनाळे, आयुक्त डॉ. विजय राठोड इत्यादी उपस्थित होते.
याविषयी सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘चेस द व्हायरस मोहीम’ आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. चाचण्या जेवढ्या वाढतील तशी रुग्णांची संख्या वाढेल. पण चाचण्या आणि सर्वेक्षण यामुळे कोरोनाचे रुग्ण शोधले जातील. वेळीच रुग्ण सापडल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल.”
महत्वाच्या बातम्या-
राज्यात आज 8369 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?
“दोन श्वासांमधील अंतर संपल्यावर प्रयत्न करुन काहीच अर्थ नाही”
पुन्हा सत्तेत आल्यास गरीबांना आयुष्यभर मोफत धान्य देणार- ममता बॅनर्जी
“देशात अमर, अकबर, अँथनी एकत्र राहू नयेत असं भाजपला स्थापनेपासूनच वाटत आलंय”
Comments are closed.