बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अंगावरचे सगळे कपडे काढ” दिग्दर्शकाने केलेल्या विचित्र मागणीचा ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

मुंबई | ग्लॅमरच्या दुनियेत आज प्रचंड प्रमाणात मुलींना अभिनयामध्ये रस आहे. सिनेमामध्ये काम करण्याच्या इच्छेने अनेकींनी आपलं घर सोडून मुंबई गाठलं. मात्र चित्रपटांमध्ये काम करणं आता तेवढं सोपं राहिलं नाही आहे. अशातच अभिनेत्री ईशा अग्रवालने तिच्या कास्टिंगच्या वेळेस दिग्दर्शकाने केलेल्या विचित्र मागणीचा खुलासा केला आहे.

ईशा अग्रवाल हिने अनेक तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्याला चित्रपट मिळावा यासाठी ईशाने अनेक प्रयत्न केले. यादरम्यान ईशाला एका मोठ्या दिग्दर्शकाने कास्टिंगसाठी बोलावलं होतं. कास्टिंगला जाताना ईशा आपल्या बहिणीला सोबत घेऊन गेली होती. कास्टिंग दरम्यान संबंधित दिग्दर्शकाने ईशाला अंगावरचे सर्व कपडे काढ, अशी मागणी केली. तसेच तसं केल्यास दिग्दर्शकाला तिची फिगर व्यवस्थित पाहता येईल असं देखील ते ईशाला म्हणाले.

दिग्दर्शकाची विचित्र मागणी ऐकून ईशा आपल्या बहिणीला घेऊन तिथून निघून गेली. मात्र सध्या अभिनेत्री होणं सोपं राहिलं नसल्याचं ईशाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर कास्टिंगला जाताना प्रत्येक मुलीने सावध राहिलं पाहिजे, असं देखील ती यादरम्यान म्हटली आहे.

दरम्यान, या क्षेत्रात तुम्हाला मोठं काम किंवा मोठे प्रोजेक्ट मिळवून देतो, असं सांगणारे अनेकजण मिळतील जे तुम्हाला भुरळ घालून फसवण्याचा प्रयत्न करतील, अशा लोकांपासून सावध रहा, असं ईशाने यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ

दिलासादायक! नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

राज्यातील ‘ही’ दुकानं आता आठवड्यातील 7 दिवस सुरू राहणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

पंढरपुर विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य आज ठरणार; चुरशीच्या लढतीत कोण होणार विजयी?

“ममता जिंकल्यास तो मोदी-शहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More