बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?”

कोल्हापूर | काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने उत्तर कोल्हापूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. कोल्हापूरमध्ये एकही आमदार नाही ही खंत भाजपला असल्याने चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस पक्षाकडून मतदार संघ वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि  गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात कलगीतुरा रंगलेला पहायला मिळत आहे.

एका भाषणात सतेज पाटील यांनी नाशिकच्या वाघांच्या अनेक भानगडी आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून चित्रा वाघ यांनी सतेज पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. निवडणूक आहे विकासावर बोला. माझ्या नवऱ्याची एकही भानगड काढून दाखवा. मी तुमच्या भानगडीचे व्हॉल्युम काढून दाखवेन, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

ज्यावेळेस राजकारणातील मुद्दे संपले जातात तेव्हा वैयक्तिक टीका केली जाते. पालकमंत्री म्हणता म्हणता बाबा मालकच झाला कोल्हापूरचा ,असा टोला चित्रा वाघ यांनी सतेज पाटलांना लगावला होता. मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?. तुमची सत्तेची मग्रुरी गुंडांवरती दाखवा, बलात्काऱ्यांवर दाखवा, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, उत्तर कोल्हापूर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. वाघांची एकही भानगड काढून दाखवा, तुमच्या भानगडींचे व्हॉल्युम निघतील, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. आता फक्त बोलणार नाही वेळ आली तर करून दाखवणार. मी एक बाई आहे त्यामुळे दुसऱ्या बाईबद्दल म्हणजेच तुमच्या बायकोबद्दल बोलणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

मनसेला मोठा धक्का! मुस्लिम कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

78 वर्षांच्या आज्जीने सर्व संपत्ती राहुल गांधींना केली दान, जाणून घ्या कारण

“हे सरकार इतकं नालायक निघालं की, वेश्यांना…”

कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

“संजय राऊत जो शब्द वापरतात तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More