“संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”
मुंबई | परळी वैजनाथ येथील रहिवासी असणाऱ्या पूजा चव्हाणने पुण्यातील महंंमदवाडी येथे आत्महत्या केली होती. या प्रकरणात पूजा चव्हाण आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे परस्पर संबंध असल्याचं आढळून आलं. या प्रकरणात राठोडांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी भाजपने केली.
एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर येणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करुन एफआयआर दाखल करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कसली वाट पाहत आहेत?, असा प्रश्न भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकरांनी विचारला आहे. तसेच संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही अधिवेशन घेऊ देणार नाही, असा इशाराही अतुल भातखळकरांनी सरकारला दिला आहे.
भातखळकर यांनी राठोड प्रकरणावरुन बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करणारं हे सरकार असल्याची टीका सरकारवर केली आहे. पुण्यामध्ये आत्महत्या केलेली तरुणी आणि मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप फिरत आहेत. तरी हे मंत्री उघड माथ्याने फिरत आहेत. यावर राज्यात काहीच होत नाही हे खेदजनक असल्याचंही भातखळकर म्हणाले.
दरम्यान, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहोत. तुमची छबी आहे तशीच राहू द्या, आम्हाला महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणत्या मंत्र्याकडून अपेक्षा नाही, मात्र उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा आहेत, असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्यात.
थोडक्यात बातम्या-
लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, अन्…; पाहा व्हिडिओ
‘नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; मराठवाड्याच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
‘कॅशियरसोबत फ्लर्टिंग करायचं नाही’; ‘या’ मेड इन पुणे पाटीनं गाजवलं सोशल मीडिया
‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
“आम्ही आमच्या घरालाही मोदींचं नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय”
Comments are closed.