बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; आप आणि काँग्रेसची ‘या’ संताला ऑफर???

नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून सध्या देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या चालूच आहेत. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तसेच राम मंदिराशी निगडीत संस्था आणि संघटनांवर सातत्याने टीका करत आहेत.

देशातील सर्व वातावरण राम मंदिराच्या मुद्द्यावरून तापलेलं असताना परमहंस दास यांनी मोठा दावा केला आहे. भारतीय जनता पार्टीला विरोध दर्शविण्यासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी 100 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा दावा दास यांनी केला आहे. तसेच दास यांनी इतरही काही गंभीर आरोप केले आहेत.

जमीन गैरव्यवहार नसून राजकीय नेत्यांची एक मोठी खेळी आहे. 17 तारखेला सकाळी दोन व्यक्ती आल्या होत्या. यावेळी त्यांनी मला 100 कोटी रुपयांची ऑफर देत भाजपचा विरोध करण्यास सांगितलं. तसेच आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने शंकराचार्य स्वरूपानंद यांना 50 कोटी रुपये दिले आहेत, असा दावा परमहंस दास यांनी केला आहे.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस किंवा आम आदमी पार्टी विजयी झाल्यास मला मुख्यमंत्री बनवण्यात येईल. अशीही ऑफर मला देण्यात आली होती. मी एक संत आहे आणि राष्ट्रहीत माझ्यासाठी सर्वोतोपरी आहे.

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

आनंदाची बातमी! पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट लहान मुलांना ‘या’ महिन्यात लस देण्यासाठी तयार

“या देशात लोकशाही आहे, दंडुकेशाही चालणार नाही”

आश्चर्यकारक! मेलेल्या मुलाला कवटाळून आईचा आक्रोश अन् क्षणातच….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More