बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकार हे काळीज नसलेलं सरकार आहे”

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र राज्य सरकारच्या अनेक प्रयत्नानंतरही एसटी कर्मचारी संप मागे घेताना दिसत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. त्यातच काल निलंबनाच्या भीतीने संतोष शिंदे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

गोपीचंद पडळकरांनी एक व्हिडीओ शेअर करत एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. संतोष शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला आहे. त्यावरून पडळकरांनी सरकारला मुर्दंडांच, काळीज नसलेलं सरकार आहे. याशिवाय गोपीचंद पडळकरांनी सरकारवर निशाणा साधत सरकारनेच संतोषचा जीव घेतला असल्याचा आरोप देखील केला आहे.

अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी संपावर बसले आहेत. संपामुळे राज्यातील एसटी सेवा 3 आठवड्यांपासून पूर्णपणे बंद आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाच प्रचंड नुकसान झालं आहे. शिवाय राज्यातील प्रवशांनाही अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावेत यासाठी अनेक प्रयत्न करून झाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याच निलंबनाच्या भीतीने संतोष कांबळे यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.

 

 

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही या देशात आहात की परदेशात? तुमचा ठावठिकाणा आधी सांगा”

“मी प्रत्येक मुर्खाला पाठींबा द्यायला हवा का?”

“एसटी कर्मचाऱ्यांनी रक्त आटवणे म्हणजे भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे”

निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवण्याचा राजकीय डाव आम्ही उलटवून लावू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More