पुणे | मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात मावळमध्ये अनोखं आंदोलन केलं. चक्क सार्वजनिक बांधकाम कार्यालयात झोपा काढत कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
मावळमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकरता कार्यकर्ते बांधकाम विभाग कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र तिथं एकही अधिकारी नसल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी झोपा काढत आंदोलन केलं.
दरम्यान, या कार्यकर्त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा
-मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी!
-मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक
-मराठा आरक्षणासाठी राणे पिता-पुत्र आक्रमक!
-मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात तीव्र संताप
Comments are closed.