महाराष्ट्र मुंबई

सरनाईक यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग सोसायटी घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली आहे. सरनाईक यांच्या नावावर 112 साताबारे असल्याची माहिती सोमय्या यांनी ईडीला दिली आहे.

सरनाईक यांनी 250 कोटी रुपये ढापले आहेत. त्यांनी कंपनीचे नावही बदलले आहे. सरनाईक यांनी ज्यांच्या संपत्ती जप्त केल्या त्यांची नावे सातबाऱ्यावर नसल्याचा दावा करतानाच सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

सरनाईक यांनी या सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करतानाच सरनाईक यांच्याकडे 112 सातबारे असल्याची तक्रारही सोमय्या यांनी ईडीकडे केली आहे.

सोमय्या यांनी कांजूरमार्ग कारशेडवरूनही सरकारवर टीका केली आहे. एमएमआरडीने काय कारनामे केले हे कांजूरमार्ग कारशेडमध्ये सर्वांनी पाहिले आहेच, असं सांगतानाच एमएमआरडीए ठाकरे सरकारच्या सचिवासारखे काम करत असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजप कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला; व्हीडिओ शेअर करत कैलास विजयवर्गीय यांनी मततादीदींना सुनावलं

‘आता लव्ह लेटर पाठवू नका’; शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावलं

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी; ‘इतक्या’ लाखांचं साहित्य लंपास

नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू!

“कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, आता जास्त काळजी घ्यावी लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या