‘मंत्री व्हायचंय का?’; सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला देवेंद्र फडणवीसांनी दिली ऑफर

नागपूर | आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Goverment) कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला.

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीसांनी सुनील प्रभूंना शिंदे गटात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान स्थितीत राज्य सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सगळे बंगले सजवले गेलेले आहे. ज्या बंगल्याची आत्ता आवश्यकता नाही, असं प्रभू म्हणाले.

एकाबाजूला सरकार प्रकल्पांवर करोडो रुपये खर्च करत आहे. त्यासाठी शासन कर्ज काढते आहे. मग ज्या बंगल्याची आवश्यकताच नाही, त्यावर लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता काय?, असा सवाल उपस्थित करुन सुनील प्रभू यांना सरकारला घेरलं. यावर फडणवीसांनी प्रभूंना प्रत्युत्तर दिलं.

प्रत्येक अधिवेशनात अशी रंगरंगोटी होत असते आणि त्याचा खर्च लाखो-करोडो वगैरे नसतो. पाहिजे तर आपल्याला खर्चाचा हिशेब पाठवतो, असं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-