बोम्मईंची बाजू घेत एकनाथ शिंदेंनी सभागृहात दिली महत्त्वाची माहिती!

नागपूर | कर्नाटक (Karnatak) सीमावादाचे पडसाद आजपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) यावरून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

संतप्त पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. खासदार तसेच महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Goverment) सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार संतप्त झाले.

अजित पवार यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा समाचार घेत असा कसा आदेश काढू शकतात?, अशी विचारणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरून निवेदन दिलं.

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. यात केंद्राने हस्तक्षेप केला ही मोठी बाब आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी समज दिली आहे. मीडियासमोर केंद्र सरकारची भूमिका त्यांनी मांडली. याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

यापूर्वीच्या सरकारने निधी आणि योजना बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरु केल्या आहेत. सीमावासिय ठराव करतात, यांच्या मागे कोण आहे याची माहिती आम्हाला पोलिसांनी दिली आहे. छगन भुजबळ आणि आम्ही मार खालला आहे. त्यावेळी हे बाकीचे कुठे होते. शासन म्हणून आपण एकत्र उभं राहिले पाहिजे. कोणतंही राजकारण आणता कामा नये. राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहेत, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही त्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही ट्विट करत आहात हे चुकीचं आह. त्यांनी सांगितलं की ते ट्विट आमचं नाहीये. त्याचीही माहिती त्यांना मिळाली आहे, असं शिंदेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-