बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबाननं काबूल विमानतळ केलं बंद; नागरिकांची देश सोडण्यासाठी धावाधाव

काबूल | अफगाणिस्तानच्या काबूलवर तालिबानींनी कब्जा मिळवल्यानंतर गंभीर परिस्थिती पहायला मिळाली. नागरिकांची स्थलांतर करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. विमानतळावर तर मुग्यांसारखी गर्दी पहायला मिळाली होती. अशातच आता अमेरिका देशातून बाहेर पडताच तालिबाननं काबूल विमानतळ ताब्यात घेतलं आहे.

अमेरिकेचे शेवटचे विमान धावपट्टीवरून उडाल्यानंतर तालिबाननं विमानतळ ताब्यात घेतलं. असं असलं तरी काही अफगाणी लोक अजूनही परदेशात जाण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे अमेरिकेनं माघार घेतल्यानंतर मंगळवारी तालिबाननं काबूूलवर विमानतळावर ताबा मिळवला आणि काबूल विमानतळ बंद केलं.

विमानतळ बंद केल्यामुळे आता अफगाणिस्तातून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनाही बाहेर पडता येणार नाही. यामुळे अफगाणिस्तान सोडून जाण्याची इच्छा असली तरी जाता येणार नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता लोक देशालगतच्या सीमेकडे धावत आहेत, जेणेकरून तिथून ते देश सोडून जाऊ शकतील.

दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तानमधील सैन्य काढून घेतल्यानंतर आता त्या ठिकाणी पूर्णपणे तालिबानचा ताबा आहे. तब्बल 20 वर्षानंतर अमेरिकन लष्कराने आपले सैनिक माघारी बोलवले आहेत. त्यामुळे तालिबानने हवेत गोळीबार करत आनंद साजरा केला.

थोडक्यात बातम्या – 

बाॅलिवूडला मोठा धक्का! ‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

राज्यातील आकडा चिंता वाढवणारा; आयसीएमआरचा महाराष्ट्राला गंभीर इशारा

ॲमिटी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन शिक्षणाचं बिगुल वाजलं

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच भारतीय तालिबानी”

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More