बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता- राजनाथ सिंह

नवी दिल्ली | तालिबाननं पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर आता त्यांचं पूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व झालं आहे. यानंतर आता तालिबाननं अफगाणिस्तानमधे नवीन सरकार स्थापन करणाऱ्याची घोषणा केली. अशातच आता तालिबानच्या विजयानंतर भारताविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

आता भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑस्ट्रेलियाचे सरंक्षण मंत्री पीटर डटन यांच्याशी तालिबाननं माजवलेल्या दहशतीविषयी बोलताना भारताविषयी चिंता व्यक्त केली आहे. तालिबान सध्या जगासमोर आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, अफगाणिस्तानमधील जमिनीचा वापर कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानवर युएन सेक्योरिटी काऊंसिल रिझॉल्युशन 2593 लागू करण्यात यावं, असं त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला म्हटलं आहे.

दरम्यान, तालिबाननं नवीन सरकार स्थापन केल्यानंतर 6 देशांना आमंत्रण पाठवलं. तालिबानच्या ताब्यामुळे दहशतवाद्यांचं मनोबल वाढेल म्हणून भारताची चिंता सध्या वाढली आहे.

थोडक्यात बातम्या – 

विक्रमी पावसानंतर दिल्ली झाली पाणी पाणी; ‘या’ मोठं विमानतळ पाण्याखाली

खोकल्यानंतर मोबाईल अ‌ॅप सांगणार कोणता आजार झालाय; जाणून घ्या अधिक माहिती

‘या’ अभिनेत्रीने एकाच चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल 17 किसिंग सीन दिले!

साकीनाका बलात्कार प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ ढसाढसा रडल्या!

“महाराष्ट्रातील लेकीबाळींचे लचके तोडले जातायेत, सरकारला लाज वाटली पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More