बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानात नवं सरकार स्थापनेच्या हालचाली; राष्ट्रपती पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

काबूल | तब्बल 20 वर्षानंतर अमेरिकनं अफगाणिस्तान सोडलं आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 31 ऑगस्टची कालमर्यादा ठरवली होती. या तारखेच्या एक दिवस आधीच अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया पुर्ण करत अफगाणिस्तानचा भूभाग सोडला.

तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत अमेरिकेच्या माघारी परतल्याचा आनंद साजरा केला. सोमवारी अमेरिकन सैन्याने  माघार घेतल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. आता तालिबान्यांनी नव्या सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. तसेच लवकरच सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानी नेता मुल्ला बरादर लवकरच काबूलमध्ये येणार आहे. तालिबानचं नवं सरकार काही दिवसात स्थापन करणार आहेत. तालिबानी नेता मुल्ला बरादर राष्ट्रपती पदासाठी आघाडीवर आहे, असं वक्तव्य तालिबानी नेता अनस हक्कानीने केलं आहे.

दरम्यान, कंधारमध्ये तालिबानी नेत्यांनी सरकार स्थापनेसाठी चर्चा केली. कतारची राजधानी दोहा येथून परतल्यावर तालिबानी कंधारमध्ये थांबले होते. तालिबानी मुख्य नेता हिबतुल्लाह अखुंदजादा सुद्धा उपस्थित होता. त्यावेळी एकीकडे तालिबानचं नवं सरकार स्थापन होत असताना, भारताने अधिकृतपणे तालिबानसोबत चर्चा करायला सुरूवात केली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मुलींनी कंडोम विकत घेण्यात गैर काय?’;’या’ अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य

…अन् काँग्रेसच्या माजी आमदारानं एका बुक्कीत फिरता फॅन रोखला; पाहा व्हिडीओ

पुढील तीन दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

देशातील पहिलं लसवंत राज्य! ‘या’ राज्याने पुर्ण केली 100 टक्के लसीकरण मोहिम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More