बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेची चिंता वाढली; लष्करी साठ्यावर आता तालिबानचा कब्जा

काबूल | अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर लगेचच तालिबानने देशात सत्ता स्थापन केली. बंदूकीचा धाक दाखवत तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. अफगाणिस्तानसाठी शस्त्र आणि संरक्षणावर अमेरिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केलं होता. अशातच आता अफगाणिस्तानमधील अमेरिकेचा लष्करीसाठा तालिबानच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेेनं 8 लाख 84 हजार 311 आधूनिक पद्धतीची लष्करी उपकरणं अफगाणिस्तानमध्ये सोडली होती. यामध्ये M16 रायफल, M4 कार्बाईन्स, 82 मिमी मोर्टार लाॅंचर्स याचबरोबर हम्वी, ब्लॅक हाॅलिकॅप्टर, A26 लढाऊ विमान, नाईट व्हिजन इत्यादी उपकरांचा समावेश आहे. फोर्ब्सने दिलेल्यानुसार ही सगळी उपकरणं आता तालिबानच्या हाती लागली आहेत.

गेल्या 20 वर्षापासून अमेरिका अफगाणिस्तानमधील अफगाण सैन्य, पोलीस शस्त्रावर तसेच प्रशिक्षणावर खर्च करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या उपकरांमध्ये 76 हजारांहून लष्करी वाहनं, 208 विमान, तसेच 5.99 लाखांहून अधिक युद्धकालिन शस्त्र आहे. जवळपास 83 अब्ज डॉलर म्हणजेच 6 लाख कोटी रूपयांहून अधिक खर्च अमेरिकेने केला आहे.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर देशातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अन्न आणि पाण्याची किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. अन्न आणि पाणी मिळत नसल्यानं अनेक नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या-

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत जाताय?; प्रवेशासाठी ‘ही’ नवी नियमावली जारी

“तुम्ही बिनबापाचे आहात काय?…”; संजय राऊतांची राणेपुत्रांवर जहरी टीका

पुढचे 5 दिवस राज्यात पावसाचं सावट; वाचा हवामान खात्याचा अंदाज!

“संजय राऊतांनी वैयक्तिक टीका थांबवली नाही तर मी…”

आता अजित पवार यांच्याबद्दल नारायण राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More