बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारताने पाकिस्तानसोबत….’; तालिबान्यांचा काश्मीरबाबत भारताला ‘हा’ सल्ला

काबूल | तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर त्याठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  अलिकडेच तालिबानी नेत्यांनी समाज माध्यामांसमोर येऊन देशातील पुढची रणनिती स्पष्ट केली. तालिबान पाकिस्तानला आपले दुसरे घर मानतो. मात्र भारतासोबत व्यापार आणि सामरिक संबंध मजबूत करण्याबाबत तालिबानच्या प्रवक्त्याने भारताला महत्वाचा सल्ला दिला आहे.

अफगाणिस्तानची सीमा पाकिस्तानबरोबर भारतालाही लागून आहे. जेव्हा धर्माचा प्रश्न येतो तेव्हा आपण पारंपारिकपणे एकमेकांशी बांधिल होऊन जातो. त्यामुळे दोन्ही देशांमधील नागरिक एकमेकांशी सहजतेने मिसळून जातात, म्हणून आम्हाला शेजारील देशाबरोबरचे संबंध आणखी मजबूत करायचं आहेत, असं तालिबानचे प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं आहे.

भारत देशासोबत आम्हाला चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. त्यामुळे भारताने आपली धोरणे अफगाण लोकांच्या हितानुसार ठरवावीत, काश्मीर प्रश्नांबाबत दोन्ही देशांनी सकारत्मक भूमिका घ्यायला हवी. कारण दोन्ही देशाचे हितसंबंध एकमेकांशी जोडले गेले आहेत, असंही मुजाहिद म्हणाले.

दरम्यान, तालिबान आपली जमीन कोणत्याही देशाविरूद्ध वापरू देणार नाही. देशाची अर्थव्यवस्था कशी चालवयाची ते अजून ठरवलं नाही. मात्र तालिबान सरकार बॅंकिंग आणि कर प्रणालीवर भर देऊन कृषी- व्यापाराद्वारे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करेल, अशी शक्यताही  मुजाहिद यांनी व्यक्त केली.

 

थोडक्यात बातम्या- 

“नारायण राणे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”

बुधवारी झालेल्या लक्षणीय रूग्णवाढीनंतर पुण्यातील आजची आकडेवारी पाहा एका क्लिकवर!

अफगाणिस्तानमध्ये हाहाकार! काबूल विमानतळावर मोठा स्फोट

“तालिबानी आम्हाला काश्मीर प्रश्नावर मदत करणार आहेत”

“ओ लंके, 2 पावलं मागे नाही तर, 200 पावलं पुढे जात ठोकणार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More