“आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार असतील तर पक्षातलं आमचं स्थान काय???”

मुंबई |  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाची उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा चालू आहे. या चर्चेमुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच नाराजी आहे.

आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार असतील तर पक्षातलं आमचं स्थान काय, असा एकंदरित सूर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिसत आहे. अर्थात हे उघडपणे कुणी बोलत नाहीयेत.

साहजिकच इतक्या वर्षातून सत्ता आल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….

-…म्हणून शांघाई परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना भेटणं टाळलं

-तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार??? उदयनराजेंनी नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं…!

-राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

-राजकारणात कुणीही पर्मनंट नसतं; लोकांनी अनेक दिग्गजांना घरी बसवलंय- फडणवीस