बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज ठाकरेंच्या बोलण्यानं…’; जातीयवादाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचं राजकारण वाढल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राजकीय वातावरण याबद्दल अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना या प्रकरणावरून टोला लगावला. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी, राष्ट्रवादीच्या जन्मामुळे जातीयवाद वाढला?, असा प्रश्न केला. यावर बोलताना, हे दडपशाहीचं सरकार नाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्या बोलण्यानं काही खरं होत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज ठाकरेंच्या आरोपावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रबोधनकारांचं लिखाण वाचण्याचा सल्ला ठाकरेंना दिला होता. तर यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनकरांची पुस्तके राज यांना कुरिअर करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनतर राज ठाकरेंनी 20 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बोलताना मी प्रबोधनकार वाचले आहेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असं राज ठाकरे म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, शरद पवारांनी कायम पुरोगामी विचार मांडले आहेत. या सगळ्या गोष्टी संपुर्ण देशातील जनतेला ठाऊक आहे.  कधी तरी कोणीही काहीही बोलून जातं त्याला महत्व देण्याचं काम नाही, असं अजित पवार यांनी म्हटल होतं.

 

थोडक्यात बातम्या-

मनसेनं अमोल मिटकरींना बिस्कीट आणि श्वान दिलं गिफ्ट!

“दोन मोठी माणसं बोलताना आपलं तोंड मिटून ठेवावं”

“…आता थांबणं शक्य नाही, शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या”

सख्खा भाऊ पक्का वैरी!, अश्रफ घनींचा भाऊच तालिबान्यांना मिळाला!

“राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक वाचावं”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More