बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देश जोडण्याबद्दल बोललं की लोकांना त्रास होतो- कंगणा राणावत

नवी दिल्ली | कंगणा राणावत ही सतत आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. काही दिवसापुर्वी राज्य सरकारवर निशाणा साधताना कंगणा पाहायला मिळत होती. आता कंगणाने केलेल्या वक्तव्यांमुळे सिनेसृष्टीतील कामावर किती परिणाम झाला याबाबत आपलं मत मांडलं  आहे.

कंगणा सध्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन आली आहे. जयललीता यांच्या जीवनावरील थलाइवी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. कंगणा या चित्रपटात जयललीता यांच्या भुमिकेत आहे. थलाइवी या चित्रपटाच्या पार्श्वभुमीवर कंगणाने मनमोकळेपणाने काही गोष्टींवर आपली मतं मांडली आहेत. ती म्हणाली की माझ्या बेधडक बोलण्याने माझं प्रचंड नुकसान झालं आहे.

आपल्या देशात अशी लोक खुप आहेत ज्यांना मी बोललेलं आवडत नाही. एक अभिनेत्री म्हणून देशाकडे पाहताना मी जेव्हा देश तोडण्याची भाषा करते तेव्हा कोणाला कसलाही त्रास होत नाही, पण जेव्हा देश जोडण्याची भाषा करते तेव्हा लोकांना ते पटत नाही. या शब्दात कंगणाने आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

कंगणाने बाॅलिवूडबाबत पण आपली मतं मांडली. ती म्हणाली की, बाॅलिवूडपेक्षा साऊथ फिल्म इंडस्ट्री मला अधिक प्रभावी वाटते. या ठिकाणी किती तरी अधिक प्रभावीपणे संवाद साधला जातो. हे माझ्यावर प्रभाव टाकणारं आहे. कंगणाने नेहमी प्रमाणे आपल्या बेधडक शैलीत मतं व्यक्त केली आहेत.

थोडक्यात बातम्या 

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

“मोदी सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग कोणाचं ऐकणार आहेत?”

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता महाभारत, रामायणाचे धडे, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

“सरकार त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या चित्रपटांना क्लीनचीट देतं, नाझी जर्मनीत हेच व्हायचं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More