औरंगाबाद | राज्यातील राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांनी गाजत असतं. कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत पवार कुटुंबावर होणाऱ्य टीकेवर भाष्य केलं आहे.
प्रत्येक संघटनेला बोलण्याचा हक्क आहे. त्यामुळे राज ठाकरेही बोलत आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या सभेवर मला जास्त काही बोलायचे नाही. आमच्या कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळं लोक बोलत असतात, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
राज्यात सध्या महागाईचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे इतर मुद्यांवर कोणाला काही बोलायचं आहे ते बोलू द्या, शिवाय कोणाला कुठं जायचं तिथं जाऊ द्या, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, दंगली होऊ नये यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. दिल्लीत आणि इतर ठिकाणी झालेल्या दंगलींमुळे मी अस्वस्थ आहे. हे कोणासाठीच चांगलं नसून यातून अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
टेंशन वाढलं ! कोरोनाच्या चौथ्या लाटेचं सावट, WHO म्हणाले…
“एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानीसाठी शरद पवार जबाबदार”
राज ठाकरेंना धमकीचा फोन, केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल
महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, राजेश टोपे ‘या’ कारणामुळे नाराज
मोठी बातमी! नवाब मलिकांना न्यायालयाचा मोठा झटका
Comments are closed.