Divya Khosla-Bhushan Kumar | बॉलीवुडमधील कपलमध्ये मतभेद होण्याचं काही थांबताना दिसत नाहीये. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद-विवाद असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहेत. त्यातच प्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोट घेतल्याचं नुकतंच समोर आलं आहे. आता अजून एक जोडी (Divya Khosla-Bhushan Kumar) लवकरच विभक्त होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.
अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला हिने तिच्या नावासमोरून तिच्या पतीचं आडनाव हटवलं आहे. दिव्याने इन्स्टाग्राम या सोशल मिडिया अकाऊंटवर दिव्या खोसला कुमार या नावाने तिचं अकाउंट उघडलं होतं. पण आता त्यावर तिचं नाव केवळ दिव्या खोसला एवढंच दिसत आहे.
सोशल मिडियावर चर्चांणा उधाण
यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. तसेच तिनं टी-सीरिजलाही अनफॉलो केलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या असून अनेक तर्क-वितर्कही लावले जात आहेत. टी-सीरिजचा मालक भूषण कुमार हा दिव्या खोसलाचा पती असून दोघांत काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जातंय.
सोशल मिडियावर सध्या दिव्याच्या इन्स्टा प्रोफाईलचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. तिच्या नावापुढे ती पतीचं नावही लावायची, मात्र आता तिने ते हटवलंय, असा दावाही करण्यात येत आहे. एका रेडिट पोस्टनंतर दिव्या आणि भूषण कुमार (Divya Khosla-Bhushan Kumar) यांच्याबद्दल चर्चा होत आहेत.
दिव्या आणि भूषण वेगळे होणार?
दोघांनीही यावर अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, या सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे तेही लवकरच विभक्त होणार असल्याचं म्हटलं जातंय. दिव्या सध्या तिच्या आगामी ‘हीरो हिरॉईन’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. याद्वारे ती साऊथमध्ये डेब्यू करणार आहे.
View this post on Instagram
दिव्या ‘यारियां -2’ (2023) आणि ‘सत्यमेव जयते – 2’ (2021) या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. दिव्या आणि भूषण यांची पहिली भेट ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यांनी 2005 मध्ये लग्न केलं. आता त्यांच्या (Divya Khosla-Bhushan Kumar) विभक्त होण्याच्या चर्चा रंगत आहेत.
News Title – Talks of Divya Khosla-Bhushan Kumar having a fight
महत्त्वाच्या बातम्या –
लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!
मंदिरावरही लागणार ‘कर’, ‘हिंदूविरोधी’ म्हणत काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!
IPL फायनलची तारीख ठरली; धोनीच्या गडातून होणार स्पर्धेची सुरूवात!
…तर खेळाडूंना मिळणार 1 कोटी अन् BMW कार; HCA ची मोठी घोषणा
बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?