शपथविधीआधी वर्षावर हायव्होल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Eknath shinde

Eknath Shinde | मुंबईच्या आझाद मैदानात आज महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अवघे तीन तास बाकी असताना वर्षा बंगल्यावर हायव्होल्टेज ड्रामा सुरू असल्याचं चित्र आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र, यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

अशात एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे वर्षावर पोहोचले आहेत. गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे गटात अजूनही पेच कायम असल्याचं बोललं जातंय. तर, शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनीही देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली आहे.

गृहमंत्रीपदावरून अजूनही पेच कायम?

एकनाथ शिंदे अजूनही गृहमंत्रीपदाबाबत ठाम असल्याची चर्चा आहे. मात्र, यावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. त्यातच एकनाथ शिंदे जो काय निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असं आमदार शंभूराज देसाई म्हणाले आहेत. कालही पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी संध्याकाळपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता.

इतकंच नाही तर, आझाद मैदान येथे आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी तीनही पक्षांनी वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. मात्र, त्यावर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नावच छापलेलं नाही. यामुळे देखील वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

“…तर आम्ही गप्प बसणार नाही”

“एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही आणि त्यांनी ते शिवसेनेच्या इतर नेत्याला दिले तरी आम्ही ते स्वीकारणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. आमच्या कुणाच्याही मनात या खुर्चीवर बसण्याचा विचार नाही. हा खुलासा करणेही आमच्यासाठी दुर्दैव आहे. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आमच्या सर्वांचे राजकीय भवितव्य त्यांच्या हातात दिले आहे. त्यांना डावलून कुणी काही करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

News Title –  Talks of Eknath Shinde being upset

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

शपथविधिला काही तास बाकी असताना अजित पवारांचं मोठं स्टेटमेंट, चर्चांना उधाण!

अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न यंदाही अपूर्णच, मात्र केला ‘हा’ नवा रेकॉर्ड!

एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार?; ‘या’ बड्या नेत्याने सस्पेन्स संपवला

शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन, चर्चेला उधाण

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .