दिल्लीतून ‘तो’ निरोप आला अन् इकडे एकनाथ शिंदे रूसल्याच्या चर्चेला उधाण

Talks of Eknath Shinde being upset  

Eknath Shinde | विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आजच (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. यानंतर सर्वांचं लक्ष हे शपथविधीच्या कार्यक्रमाकडे लागलं आहे. महायुतीमध्ये अद्यापही मुख्यमंत्री पदाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे आघाडीवर आहेत. अशातच फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय.

यासंदर्भातील निरोप हा एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याचंही बोललं जातंय. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनाच संधी मिळावी म्हणून आग्रही मागणी केली जात आहे. तर, दिल्लीत फडणविसांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार?

देवेंद्र फडणवीस हे काल, सोमवारीच दिल्लीला रवाना झाले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कुटुंबातील विवाहाच्या समारंभासाठी ते दिल्लीला गेल्याचे समजते. मात्र, याच दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेबाबत त्यांची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांच्यातील टेन्शन देहबोलीतून जाणवत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सीएम पदाबाबत भाजप दावा करू शकतो, असं म्हटलं जातंय.

शनिवारी विधानसभेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले. निवडणूक आयोगाने रविवारी अधिकृतपणे राज्यपालांची भेट घेऊन नवनियुक्त आमदारांची यादीही सादर केलीये.यानंतर लगेच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणे अपेक्षित होते.मात्र, अजूनही यासंदर्भात निर्णय न झाल्याने शपथविधीसाठी विलंब होण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde )

News Title –  Talks of Eknath Shinde being upset  

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

सरकारकडून Pan Card संबंधी मोठा बदल; जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, कारण..

नागराज मंजुळेंच्या अडचणीत मोठी वाढ; नेमकं काय प्रकरण?

गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर

राज्याला मिळणार ओबीसी मुख्यमंत्री?, नव्या मागणीची जोरदार चर्चा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .