Ramdas Athwale | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी, महायुती, मनसे, तिसरी आघाडी, वंचित अशा सर्वच पक्षाकडून आपले उमेदवार जाहीर केले जात आहेत. अशात महायुतीमधील आठवले गट हा नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकारणात होऊ लागली आहे. (Ramdas Athwale )
महायुतीत ‘रिपाइं’ने सर्वात आधी 12 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील धारावी, चेंबूर, केज, पुणे जिल्ह्यातील एक जागा आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या अशा 5 जागांवर आठवले गटाने आग्रह केला होता. मात्र, महायुतीच्या यादीत आतापर्यंत ‘रिपाइं’ला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यातच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदार संघावरचा दावा सोडायला आठवलेंनी नकार दिलाय.
रामदास आठवले महायुतीवर नाराज?
उमरखेडमधून महेंद्र मानकर यांना उमेदवारी देण्यासाठी आठवलेंचा आग्रह आहे. मानकर यांना भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर लढवण्यासाठी आठवले तयार असल्याचं बोललं जातंय. मात्र, याला अद्याप युतीत हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे आठवले हे नाराज असल्याची चर्चा रंगते आहे. आठवले 12 जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचं आता म्हटलं जातंय.
उमरखेडमध्ये सध्या भाजपचे नामदेव ससाणे आमदार आहेत. भाजपकडून माजी आमदार उत्तमराव इंगळे आणि राजेंद्र नजरधणे देखील येथून इच्छुक आहेत. तर रिपाइंचे महेंद्र मानकर यांना कमळावर लढविण्याचा प्रस्ताव आठवले यांनी ठेवलाय. असं नाही झाल्यास आठवले (Ramdas Athwale ) स्वबळावर राज्यभरात 12 उमेदवार उतरवणार असल्याच्या तयारीत आहेत.
भाजपमध्ये राजीनामासत्र सुरूच
दुसरीकडे युतीमध्येच अनेक जागांवर उमेदवारी न मिळाल्याने नाराजी वाढत चालल्याचं चित्र आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये भाजपातील राजीनामा सत्र अजूनही सुरूच आहे. तालुक्यातील तीनशेहून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. तर, आज बार्शीटाकळी तालुक्यातल्या जवळपास 200 च्या वर कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे दिलेत.
अकोल्यातील मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची सध्या चर्चा आहे. पिंपळेंऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी मिळणार अशी कुजबूज आहे. यामुळे भाजपमध्ये हे नाराजीनाट्य आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा फटका महायुतीला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. (Ramdas Athwale )
News Title – Talks of Ramdas Athwale being upset on mahayuti
महत्त्वाच्या बातम्या-
पुढील चार, पाच दिवस ‘या’ भागात पाऊस हजेरी लावणार!
चक्र बदलणार! देशात जनगणना कधी होऊ शकते?
आली आली दिवाळी! आज वसुबारस सण, जाणून घ्या पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त
वंचितची आठवी यादी जाहीर, आदित्य व अमित ठाकरेंविरोधात दिले उमेदवार