मंत्रीमंडळात संधी हुकली, रवी राणा कमालीचे नाराज?; चर्चेला उधाण

Talks of Ravi Rana being upset

Ravi Rana | महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार काल नागपूर येथे पार पडला. मात्र, यानंतर भाजपा, शिवसेनासह राष्ट्रवादीमध्येही नाराजीचे सुर उमटत आहेत. महायुतीत अनेक दिग्गजांना यावेळी मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. आपल्याला मंत्रीपद दिलं नाही, यामुळे काही नेते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यात अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) हे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं बोललं जात आहे. आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशन असताना रवी राणा हे थेट अमरावतीला परतले आहेत. रवी राणा हे सुरुवातीपासूनच फडणवीसांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांना यंदा मंत्रीपद मिळणार, अशी अपेक्षा होती. मात्र, नव्या सरकारमध्ये त्यांची संधी हुकली.

रवी राणा (Ravi Rana) अचानक रात्रीतच नागपूर सोडून अमरावतीला निघून गेल्याने चर्चांना उधाण आले. अमरावती-नागपूर अंतर कमी असल्याने ते आज परत नागपूरला परतू शकतात. मात्र, त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पेव फुटले आहे. त्यातच त्यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट देखील चर्चेत आली आहे.

रवी राणा नाराज असल्याच्या चर्चा

रवी राणा यांच्या पत्नी आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट केली आहे. ‘जिंदगी है.. समुंदर को क्या गम है, वो बता भी नहीं सकता और पानी बनकर आँखो में आ भी नही सकता. जिंदगी है और लडाई जारी है..’ , अशी पोस्ट नवनीत राणा यांनी केली आहे. या पोस्टने नाराजीच्या चर्चा आणखीनच वाढल्या आहेत.

दरम्यान, रवी राणा (Ravi Rana) हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातून 2009 पासून सलग 4 वेळा विजयी झाले आहेत. 2009, 2014, 2019 मध्ये ते अपक्ष विजयी झाले. तर, नुकत्याच झालेल्या विधानसभेत देखील त्यांनी बाजी मारली. यंदा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र त्यावर पाणी फेरले आहे.

News Title : Talks of Ravi Rana being upset

महत्वाच्या बातम्या –

“…तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल”; राऊतांचं वक्तव्य

मंत्रीमंडळात डावलल्याने छगन भुजबळ नाराज, घेणार मोठा निर्णय?

महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रीपद नेमकं कुणाला?

कलाविश्वात शोककळा! जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन

आज सोमवारी महादेव कुणावर करणार सुखाचा वर्षाव?, वाचा राशीभविष्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .