मोठी बातमी! समीर वानखेडे ‘या’ पक्षाकडून विधानसभा लढवणार?

Sameer Wankhede | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. पुढच्या महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. आता यामध्ये एक मोठं नाव जुडलं आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Sameer Wankhede)

चेन्नईमध्ये पोस्टिंग असलेले समीर वानखेडे राजीनामा देऊन निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. येत्या काही दिवसात समीर वानखेडे हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जातंय. मात्र, समीर वानखेडे यांनी यबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

समीर वानखेडे शिंदे गटात जाणार?

या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुंबईमधील धारावी या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. धारावीत वर्षा गायकवाड आमदार होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला. त्यामुळे आता या जागेवर त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांना तिकीट दिलं जाऊ शकते, अशी चर्चा आहे. अशात धारावीमध्ये ज्योती गायकवाड आणि समीर वानखेडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटप संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी कधीही जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. (Sameer Wankhede)

कोण आहेत समोर वानखेडे?

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आले होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची प्रचंड चर्चा झाली होती. 44 वर्षीय समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. 2021 पर्यंत त्यांनी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर म्हणून काम केले. (Sameer Wankhede)

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे टाकले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण जेव्हा बाहेर आली होती, तेव्हा त्या सर्व कारवायांमागे समीर वानखेडे यांचं दमदार नेतृत्व होतं. याशिवाय ते मराठीतील अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. त्यांनी 2017 साली क्रांती रेडकरसोबत विवाह केला. त्यांना जुळ्या मुली आहेत.

News Title – Talks of Sameer Wankhede contesting assembly elections

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात बड्या व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

सोन्याची जोरदार आघाडी, 10 ग्रॅमसाठी आता मोजा ‘इतके’ रुपये

SBI ने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! लोन झालं स्वस्त

‘सरन्यायाधीश’ पदाच्या दावेदाराचं नाव समोर! डी. वाय. चंद्रचूड यांनी केली शिफारस

मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर!