Vasant More | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. वसंत मोरे हे सर्वप्रथम मनसे पक्षात होते. मात्र, त्यांनी राज ठाकरे यांना धक्का देत लोकसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. वंचितकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देखील मिळाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत वसंत मोरेंचं डिपॉझिट जप्त झालं. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता वसंत मोरे (Vasant More) ठाकरे गटालाही धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत.
काल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कात्रजच्या सभेत एक मोठं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. वसंत मोरेंच्या हाती कधीही तुतारी देऊ शकतो, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलंय. यामुळे आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
जयंत पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे वसंत मोरे लवकरच शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर स्वतः वसंत मोरे यांनीही भाष्य केलंय. अवघ्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत. मी पहिल्यांदाच आयुष्यात राष्ट्रवादीच्या स्टेजवर बसलो होतो. आताच्या घडीला आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायला तयार आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुकीलाही मशाल, तुतारी, हाताचा पंजा एकत्र राहिला पाहिजे ही खबरदारी घ्या, असं वसंत मोरे (Vasant More) म्हणाले आहेत.
“आम्ही हातात मशाल घेऊन कधीच तुतारी वाजवायची तयारी केली आहे. माझ्या प्रभागात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला तुतारी हातात घ्यायची गरज पडणार नाही.”,असं वसंत मोरे म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाचा आता वेगवेगळा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.
वसंत मोरे शरद पवार गटात जाणार?
वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे. तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो, असं विधान जयंत पाटील यांनी कात्रजच्या सभेत केलं होतं. त्यातच वसंत मोरे (Vasant More) यांनीही आम्ही हातात मशाल घेऊन कधीच तुतारी वाजवायची तयारी केली असल्याचं म्हटलंय, त्यामुळे या दोन्ही वक्तव्याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे.
News Title : talks of Vasant More may join Sharad Pawar group
महत्वाच्या बातम्या –
“जिल्ह्यात ऊस शेतकऱ्यांना उच्चांकी दर देणार”; संभाजी निलंगेकरांची घोषणा
परळीत बहीण भाऊ जोमात! “धनुभाऊंनी कमळाच्या चिन्हावर…”
उद्धव ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; बडा नेता बांधणार शिवबंधन
खासदार महाडिकांवर गुन्हा दाखल; लाडक्या बहिणींना नेमकं काय म्हणाले?
PM मोदी उद्या पुण्यात; मंगळवारी ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?