तमन्नाकडून विजय वर्मासोबतच्या नात्याबद्दल खुलासा, म्हणाली ‘मला नुकत्याच काही नव्या गोष्टी…’

tammanna bhatiya

Tamannaah Bhatia | तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. 2022 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती, आणि त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या नात्याला भरभरून प्रेम दिलं. एकत्र दिसणाऱ्या या जोडीबद्दल लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या पसरल्या आहेत.

तमन्ना भाटियाचे प्रेमाविषयी मत-

तमन्ना (Tamannaah Bhatia) आणि विजय यांच्यातील दुराव्याचं नेमकं कारण काय, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्यांनी सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो हटवल्याचं सांगितलं जात आहे. या चर्चांदरम्यान तमन्ना भाटियाने एका मुलाखतीत प्रेमावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

ती म्हणाली, “मला प्रेमाबद्दल नुकत्याच काही नव्या गोष्टी समजल्या. लोक प्रेम आणि नातं यात गोंधळ करतात. हे नातं केवळ स्त्री-पुरुषांसाठी मर्यादित नाही, तर मित्रांमध्येही असतं. मात्र, जेव्हा प्रेमामध्ये अटी आणि नियम येतात, तेव्हाच ते संपतं असं मला वाटतं. खरं प्रेम कोणत्याही बंधनात नसावं.”

प्रेम म्हणजे व्यक्तीला मुक्त करण्याची प्रक्रिया-

तमन्नाने (Tamannaah Bhatia) तिच्या पुढील वक्तव्यात प्रेमाची नव्या दृष्टीकोनातून व्याख्या केली. ती म्हणाली, “प्रेम हे दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये असलं तरी ते एकतर्फी असतं. तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला बंधनातून मुक्त केलं पाहिजे. कोणत्याही नात्यात जबरदस्ती किंवा विचार लादणे योग्य नाही. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची जशी आहे तशीच स्वीकारण्याची तयारी हवी.”

चाहत्यांचा मोठा हिरमोड-

तमन्ना आणि विजय वर्मा यांनी ‘लस्ट स्टोरीज 2’च्या शूटिंगदरम्यान जवळीक साधली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. अनेक वेळा हे दोघं एकत्र कार्यक्रमांमध्ये दिसले. मात्र, आता त्यांचं नातं संपल्याच्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल उत्सुक असणाऱ्या चाहत्यांना हे वृत्त निराशाजनक वाटत आहे.

News Title : Tamannaah Bhatia and Vijay Varma breakup?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .