पुणे | गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अनेक क्षेत्रांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. गत काही महिन्यांपूर्वी कोरोना आकडेवारीत मोठी घट झाली होती पण जानेवारीच्या सुरूवातीपासून राज्यात अचानकपणे कोरोना आकडेवारी वाढली आहे. अशात परत एकदा राज्य सरकारनं निर्बंध लावले आहेत. सरकारनं आता निर्बंध उठवावेत यासाठी मागणी करण्यात येत आहे.
गत दीड वर्षापासून अनेक क्षेत्रात निर्बंध आहेत. अशात राज्यातील लोककलावंताच्या पोटाचा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुविर खेडकर यांनी गंभीर वक्तव्य केलं आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्यासाठी परवानगी न दिल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा खेडकर यांनी दिला आहे.
नाटक, चित्रपटांना सरकार 50 टक्के क्षमतेनं परवानगी देऊ शकतं तर आम्हाला का नाही, असा सवाल खेडकर यांनी अजित पवार यांना केला आहे. राज्य सरकार आम्हाला परवानगी का देत नाही, असंही खेडकर म्हणाले आहेत. राज्य सरकार आमचे मायबाप आहेत. त्यांना सोडून आम्ही कुणाकडं जावं, चीन की पाकिस्तान, असंही खेडकर म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू आहेत. पण खेडकर यांच्या या वक्तव्यानंतर सरकार तमाशा कलावंतांना परवानगी देणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
थोडक्यात बातम्या
26 जानेवारीला पथसंचलनात दिसणार महाराष्ट्राचा अनोखा चित्ररथ! पाहा फोटो
“प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये येणार होते पण…”, प्रियंका गांधींचा सर्वात मोठा खुलासा
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
मोदींच्या मंत्र्याचा अजब कारभार! दार बंद करून केली अधिकाऱ्याला मारहाण
KL Rahul ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; रक्कम ऐकून थक्क व्हाल!
Comments are closed.