नवी दिल्ली | तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर जिल्ह्यामध्ये एका तरुणीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही तरुणी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये शौचासाठी गेली असता हा प्रकार घडला. तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी या तरुणाने दाखवलेला चाकूनेच त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तरुणाने तिच्या गळ्यावर चाकू ठेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचं या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सांगितलं आहे.
हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने त्याला जोरात धक्का दिला. हा तरुण जवळच्या झाडावर आदळला तेव्हा त्याच्या हातातील चाकू खाली पडला. पडलेला चाकू उचलून या तरुणीने त्याच्या गळ्यावर अनेकदा वार केले. या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही तरुणी स्वत:च स्थानिक पोलीस स्थानकात पोहचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
थोडक्यात बातम्या-
“सोनिया गांधी आणि मायावतींना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”
काँग्रेसमध्ये भूकंप? निम्म्यापेक्षा अधिक आमदार पक्ष सोडणार असल्याचा काँग्रेस नेत्याचाच दावा
औरंगाबाद की संभाजीनगर?; काँग्रेस नेते म्हणतात, “हा वाद निरर्थक आणि राजकीय”
बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध डिझायनरनं केला लिंगबदल; सोशल मीडियावर केली पोस्ट
‘त्याच्यामुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं’; नीरव मोदीची बहिण माफीचा साक्षीदार होण्यास तयार