Heart Attack l क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांग्लादेशच्या माजी कर्णधार तमीम इक्बालला सामना सुरु असताना हृदयविकाराचा झटका आला आहे. ढाका प्रीमियर डिव्हिजन लीगमध्ये खेळताना अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, तमीम सध्या धोक्याच्या बाहेर असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दमदार कारकीर्द :
तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून सध्या तो केवळ लीग क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत 70 कसोटी, 243 एकदिवसीय, आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत.
कसोटीमध्ये त्याने 5134 धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये 8357 धावा, आणि टी-20 मध्ये 1758 धावा केल्या आहेत.
Heart Attack l क्रिकेट विश्वात चिंतेचे वातावरण :
सामन्यादरम्यान तमीमला छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने ईसीजी चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तमीमला ढाक्यातील फजिलातुन्नेस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील सामन्यादरम्यान घडली. तमीम मोहम्मद स्पोर्टिंगकडून खेळत होता.
तमीमच्या अचानक तब्येतीमुळे क्रिकेट विश्वात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील काही तास त्याच्या प्रकृतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.