मुंबई | सैराट चित्रपटानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. सैराटच्या कलाकारांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. सैराटचा लंगड्या आठवतोय ना? हा तोच लंगड्या म्हणजे तानाजी गालगुंडे, आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तानाजी गालगुंडे आता झी टाॅकिज प्रस्तुत ‘गस्त’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो ‘अमर’ नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. त्याच्या सोबत अभिनेत्री मोनालिसा बागल ही देखील चित्रपटात आहे. ‘एक गावाकडचा मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो. ज्या गावात राहत असतो, त्या गावात गस्त घालताना आवडणाऱ्या मुलीला चोरून भेटतो आणि नंतर ही प्रेमकथा एका वेगळ्या वळणावर जाते’. अशी या चित्रपटाची भन्नाट कथा आहे. यात आपल्याला गावाकडच्या गोष्टी देखील अनुभवायला मिळतील.
सैराटच्या कलाकरांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. परश्या आणि आर्चीची भूमिका करणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना इतरही चित्रपट भेटले. त्यात आता लंगड्याची देखील वर्णी लागली आहे. सैराटनंतर सगळीकडे त्याचे फॅन वाढले आहेत. तानाजी वेगवेगळ्या कार्यक्रमाला देखील उपस्थित असतो. त्यामुळे त्याची ग्रामीण भागात चांगलीच हवा आहे. त्यामुळं त्याच्या आगामी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
थोडक्यात बातम्या-
चुकीला माफी नाही… मुंबई पोलिसांनी रणबीरची गाडी घेतली ताब्यात!
मुंबई-पुण्यातील ही गोष्ट आता कोल्हापुरातही, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा!
शेतकऱ्यांनो सावधान… राज्याच्या ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता!
“मंत्री झाल्यावर मला कळालं, की त्यासाठी फार अक्कल लागत नाही”
गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक; अजित पवारांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट!