Tanaji Galgunde | प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट महाराष्ट्रभर गाजला. बाॅक्स ऑफिसवर या चित्रपटाने तूफान कमाई केली. 2016 मध्ये सैराटने संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. यामधील सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज देखील या चित्रपटाचा चाहतावर्ग टिकून आहे. आर्ची, परश्या, यांच्या सोबत इतर कलाकारांना देखील चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. दरम्यान, या मधील बाळ्याची भूमीका साकरणाऱ्या तानाजीची सध्या जोरदार चर्चा आहे.
काय आहे प्रकरण?
सैराटमधील बाळ्याची भूमीका साकारणारा अभिनेता तानाजी गालगुंडेच्या (Tanaji Galgunde) वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. तानाजीने “मला लग्न ही लग्नव्यवस्था पटत नाही, मला आता फक्त Live In Relation पटतं असं मत त्याने मांडलं आहे”. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना तानाजीने लग्नाबाबतचं त्याचं मत मांडलं आहे.
मला Live In Relation पटतं- तानाजी
बोलत असताना तानाजी (Tanaji Galgunde) म्हणाला की, लग्न ही व्यवस्था मला तरी पटत नाही, आता मला फक्त Live In Relation पटतं. पुढे तो म्हणाला की, आपल्या लग्नासाठी आपण पोरीला आवडतो का नाही हे बघायचं एवढंच नाही तर सगळ्यांनी एकत्र यायचं. शिवाय एक दिवसासाठी अवडंबर का काढायचा? त्यानंतर लग्नासाठी नाही म्हटलं तरी 5-10 लाख खर्च करा, मग या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मला Live In Relationship कधीही ग्रेट वाटते.
लग्नात नाच गाणे होत असतात वाजत गाजत वरात काढाण्यापेक्षा एखादी पार्टी करावी असं मला वाटतं. लग्न करायचं असेल तर रजिस्टर करावं. एवढा खर्च करण्यापेक्षा 2-4 हजारात लग्न करा, असं मत तानाजी यांनी मांडलं आहे.
News Title : Tanaji Galgunde talks about live in relation
महत्त्वाच्या बातम्या-
पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालमाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई
“माझ्या शरिरावर टॅग, शिवाय त्या रात्री झोपायला…”, करिश्मा कपूरने केला गौप्यस्फोट
मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली
सानिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सानिया मिर्झाचा एक्स नवरा शोएब मलिकने केली मोठी घोषणा; म्हणाला, “पुन्हा एकदा..”