मनोरंजन

हर मराठा पागल है…शिवाजी राजे का, भगवे का; ‘तान्हाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | अभिनेता अजय देवगणच्या ‘तान्हाजी द अनसंग वाॅरिअर’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणच्या या बहुचर्चित चित्रपटाची वाट चाहते अनेक दिवसांपासून पाहत होते. अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे.

हर मराठा पागल है… स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का… असे जबरदस्त संवाद या चित्रपटात पाहायला मिळत आहे. अभिनेत्री काजोल सावित्री मालुसरेंच्या तर अभिनेता सैफअलीखान उदयभानच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 3डी मध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित होईल.

दरम्यान, तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचे सुभेदार होते. महाराजांनी त्यांच्यावर कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचे काम दिले होते. यावेळी त्यांनी प्राणाची आहूती देऊन किल्ला ताब्यात घेतला होता. यावेळी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’ असे उद्गार काढले होते.

 

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या