बंडखोर आमदाराकडून आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाले…
पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिंदे गट स्थापन होण्यामागे तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांचा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान तानाजी सावंत यांच्या घराशेजारी आदित्य ठाकरेंचं( Aditya Thackray) शक्तिप्रदर्शन होत आहे. यावर बोलताना तानाजी सावंतांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाचं हल्लाबोल केला.
कोण आदित्य ठाकरे ?, तो एक आमदार असल्याचे म्हणत सावंतांनी आदित्य ठाकरेंचा एकेरी नावाने उल्लेख केला. शक्ती निघून गेल्यास शक्तिप्रदर्शन करण्यात काय अर्थ ?,असंही सावंत म्हणाले. तसेच त्यांनी बंडात घेतलेल्या सहभागामुळे सावंतांचं पुणे येथील कार्यालय फोडण्यात आले होते. त्यावर बोलताना सावंत म्हणाले, ज्यांनी कार्यालय फोडले, त्यांनी आवकातीत रहावे. कोणाशी पंगा घेताय हे लक्षात ठेवा.
तसेच कार्यालयाची तोडफोड दोन वेळेस झाली, परंतु ही तोडफोड शिवसैनिकांनी(Shivsena) केली नसून ती राष्ट्रवादीच्या(NCP) कार्यकर्त्यांनी केली आहे, असा दावा सावंत यांनी केला. सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे आता काही फरक पडणार नाही, असंही सांवत म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदेच्या पुणे दौऱ्यावेळी तानाजी सावंत आणि शिंदे यांची एक तास बैठक होणार आहे. तसेच दौऱ्यादरम्यान शिंदे हे पुण्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. पुणे ग्रामीण नागरिकांच्या देखील समस्या ते जाणून घेणार आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘संजय राऊत आले आणि सगळं फिसकटलं’, बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ईडी कोठडीतील मुक्काम वाढवला
‘सगळेच दिवस सारखे नसतात दिवस फिरतात, त्यामुळे…’, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
“चाळीस ते चाळीस जागांवर निवडणुका होऊ द्या, मग बघूयात सत्ता जिंकतेय की सत्य”
“सद्यस्थितीत कोणताही पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाही”
Comments are closed.