सोलापूर | राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Mla Aditya Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital) भरती करण्याच्या सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वारंवार आव्हानाची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital) बेड ठेवायची व्यवस्था करू, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
सावंत यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. माळशिरसमध्ये (Malshiras) तानाजी सावंत यांच्या पुतळ्याचं दहन करत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.
दरम्यान, तानाजी सावंत यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसैनिक वर्गणी काढून तानाजी सावंत यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखून ठेवणार असल्याचं हाके म्हणालेत.
पन्नास खोके घेऊन तानाजी सावंत यांचं डोकं ठिकाणावर नसल्यानं त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज असल्याची टीका शिवसैनिकांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- ट्विस्ट पे ट्विस्ट; चिंचवडमधून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
- अजित पवार मुख्यमंत्री बनणार?; शरद पवारांचा मोठा खुलासा
- सर्वसामान्यांसाठी दिलासदायक बातमी; गॅस सिलेंडरचे दर कमी होणार
- पठाणनं कहरच केला की; केलीय तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई
- न्यायालयाचा एकनाथ खडसेंना सर्वात मोठा दिलासा!