बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनतेनं फेकून दिलं होतं, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे तुम्ही आज सत्तेत आहात”

उस्मानाबद | इंदापूरचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ओघाओघात केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. एका उद्यानाच्या कामासंदर्भात बोलताना, मुख्यमंत्र्यांचं मरू द्या, जाऊ द्या, असं दत्तात्रय भरणे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री आणि सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी सज्जड दम दिला आहे.

पालकमंत्री भरणे मामा तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द वापरा. आम्ही स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जीवावर सत्तेत आला आहात. तुम्हाला जनतेनं फेकून दिलं होतं, पण केवळ उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आज सत्तेत आहात हे कधीच विसरू नका, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशी वक्तव्य करत आहात. तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द आणि भाषा वापरा. तुमच्यात हिम्मत असेल आणि तुम्हाला आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर सोलापूर जिल्ह्याची हद्द उजनी धरण ओलांडून दाखवा, असं आव्हानही दत्तात्रय भरणे यांना तानाजी सावंत यांनी दिलं आहे.

दरम्यान, दत्तात्रय भरणे यांनी या सर्व प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असल्याचं म्हणत भरणेंनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल”

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

“उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते पण धुक्यात त्यांनी भलत्याच व्यक्तीचा हात धरला”

“महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम- दत्तात्रय भरणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More