मनोरंजन

कोणाची रात्र सजवून मी अभिनेत्री झाले नाही- तनुश्री दत्ता

मुंबई | कोणाची रात्र सजवून मी अभिनेत्री झाले नाही, असं म्हणत अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा तिचा संताप व्यक्त केला आहे. ती एका मुलाखतीमध्ये बोलत होती. यावेळी 10 वर्षांपूर्वी तिच्यासोबत सेटवर घडलेल्या प्रसंगाविषयी तिने सांगितलं.

2018 मध्ये तनुश्रीने ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर मी टू मोहिमेअंतर्गत असभ्य वर्तनाचे आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. याविषयावर पुन्हा एकदा तनुश्रीने तिचं मत मांडलं आहे.

नाना पाटेकर यांच्यावर मी Me Too मोहिमेअंतर्गत आवाज उठवल्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी मला पाठिंबा दिला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माझं समर्थन केलं. मात्र ट्विट करुन परिस्थिती बदलत नाही, असं तनुश्रीने म्हटलं आहे.

दरम्यान, मी नाना पाटेकर यांना कधीही सोडणार नाही. त्यांच्यामुळे माझं पूर्ण करिअर उद्धवस्त झालं. मोठ्या मेहनतीने मी माझं करिअर घडवलं होतं. कधीही कामासाठी कोणाचे तळवे चाटले नव्हते की कधीही कामासाठी कोणाची हाजी-हाजी केली नव्हती, असं तनुश्रीने सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

महापरीक्षा पोर्टलसंदर्भात महाविकास आघाडी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या- 

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करणार- इंदुरीकर

“सत्तेसाठी भुकेल्या शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये”

शांततेच्या मार्गानं सीएएला विरोध करणारे देशद्रोही होत नाही- हाय कोर्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या