तनुश्री दत्ता पोलिस स्टेशनमध्ये दाखल; नानांविरोधात करणार तक्रार

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आहे. तीची तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तनुश्रीसोबत तिचे वकील नितीन सातपुते सोबत आहे.

दोन दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने महिला आयोगाकडे धाव घेतली होती. तनुश्रीने महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. नाना पाटेकर आणि गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तीने केली होती.

दरम्यान, महिला आयोगाने मंगळवारी तनुश्रीच्या तक्रारीची दखल घेतली होती. मात्र आता तनुश्री दत्ता नानाच्या विरोधातील तक्रारीवर जबाब नोंदवण्यासाठी ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये पोहचली आहे, जवाब नोंदवल्यानंतर FIR दाखल होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या-

-गायक कैलाश खेरवर गंभीर आरोप; माझ्या मांडीवर हात ठेवला अन्…

-दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत- जयंत पाटील

-अनुपची अग्निपरिक्षा; ज्यांच्यासाठी खेळला आता त्यांच्याच विरोधात खेळणार

-एका पायानेच तो 10 किलोमीटर धावला; अन झिंगाट गाण्यावर बेधुंद नाचला- पाहा व्हिडिओ

-राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पक्का, यांची खुर्ची धोक्यात?, तर यांना मिळणार संधी?

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या