आता तनुश्रीची नवी मागणी; नाना पाटेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई | नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वादाला आता नवीन तोंड फुटलं आहे. तनुश्री दत्ताने आता नाना पाटेकर यांच्यासह इतरांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. 

तनुश्रीने आपल्या वकिलांमार्फत एक अर्ज ओशिवरा पोलीस ठाण्यात दिला आहे. त्या अर्जात तीने ही मागणी केली आहे. नार्कोसोबतच लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी देखील या अर्जात करण्यात आली आहे. 

नाना पाटेकर यांचे राजकीय क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत. त्यामुळे माझ्यावर दबाव टाकला जाऊ शकतो, असा आरोप देखील या अर्जात तनुश्रीने केला आहे. 

दरम्यान, 2008 साली हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्यानंतर #MeTooची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पृथ्वी शॉला मनसेच्या धमक्या; काँग्रेस खासदाराचे आरोप

-सलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर रेप केला, माझ्या वडिलांचा खून केला!

-जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

-रावण महात्मा; रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी

-दक्षिण भारतापेक्षा मला पाकिस्तान अधिक जवळचा- नवज्योत सिंग सिद्धु