बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झोमॅटो बाॅय प्रकरणात तनुश्री दत्ताची एंट्री, परिणीती चोप्राला तनुश्रीचा सवाल, म्हणाली…

मुंबई | काही दिवसांपुर्वी एका फॅशन माॅडेलचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओमध्ये तीने सांगितल्याप्रमाणे एका झोमॅटो बाॅयने तीच्या नाकावर हल्ला केला होता. त्यानंतर ह्या व्हीडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घातला होता. त्यानंतर त्या डिलिव्हरी बाॅयवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

या प्रकरणात खुप लोकांनी डिलिव्हरी बाॅयच्या बाजूने प्रतिक्रीया दिली आहे. एवढचं नाही बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील त्याच्या बाजूने प्रतिक्रिया देत ट्वीट केलं होतं. अशातच तनुश्री दत्ताने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत परिणीतीला प्रश्न विचारला आहे.

शेअर केलेल्या तनुश्री दत्ताच्या फोटोमध्ये तिने अनेक प्रश्न विचारले आहे. परिणीती चोप्रा डिलिव्हरी बाॅयला साथ देत आहे मात्र घटना स्थळी ती तिथं हजर होती का?, असा सवाल तनुश्रीने केला आहे. एवढचं नाही तर आज-कालचे पुरुष स्त्रिायंवर अत्याचार करतात आणि शिक्षेच्या भीतीने कबुल देखील करत नाही. जर महिलेने त्याला पैसे दिले नाही तसेच त्याला चप्पलने मारल्या नंतर डिलिव्हरी बाॅयने पोलिसांमध्ये तक्रार का केली नाही?, असा सवालही तनुश्रीने परिणीतीला विचारला आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी परिणीती चोप्राने डिलिव्हरी बाॅयच्या बाजूने एक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. एवढचं नाही तर काही मदत लागल्यास ती करायला तयार असल्याचं देखील परिणीतीने तीच्या ट्वीटमध्ये सांगितलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

“मर्सिडीज सोबत भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजप नेते याचा खुलासा करतील का?”

महादेव जानकर पुन्हा पवारांना शह देण्याच्या तयारीत!

महिंद्रा जीप चालकाचा ‘हा’ प्रताप वाचून तूम्हीही व्हाल हैराण

‘एनआयए’चा मोठा खुलासा! CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच!

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More