बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या सदस्याच्या निधनानं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर शोककळा

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम केलं आहे. मात्र या मालिकेवर सध्या शोककळा पसरली आहे. कलाकारांना वेगवेळ्या रूपात आणणारे आणि मेकअप आर्टीस्ट म्हणून काम करणारे आनंद परमार यांचं ८ फेब्रुवारीला निधन झालं.

मागील काही दिवसांपासून आनंद परमार यांची तब्बेत ठीक नव्हती. अशा परिस्थितीत देखील ते मालिकेच्या सेटवर येऊन आपलं काम प्रामाणिकपणे करत होते. मालिकेतील महत्वपूर्ण सदस्याचं निधन झाल्यामुळे अनेकांनीच दु:ख व्यक्त केलं आहे. कांदिवली येथे परमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं.

परमार यांच्या निधनाची बातमी मिळताच सोशल मिडियाच्या आधारे अनेकांनी श्रद्धांजली दिली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’या मालिकेशी गेल्या 12 वर्षापासून ते जोडलेले होते. तसंच या मालिकेत अंबिका रांजनकर यांनीही परमार यांच्या निधनाचं  दु:ख व्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Anand dada, May his soul attain sadgati🙏 Senior makeup man… hardworking, ever jovial and loving…

A post shared by Ambika (@hasmukhi) on

परमार यांच्या निधनानंतर मालिकेच चित्रीकरण एका दिवसासाठी थांबवण्यात आलं होतं. ‘शो मस्ट गो ऑन’ असं बोलत या मालिकेतील कलाकार कामावर पुन्हा दाखील होतील.

ट्रेंडिंग बातम्या – 

ती आपल्यातून निघून गेली, पण नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- देवेंद्र फडणवीस

पीडितेच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी दिली जाईल- अनिल देशमुख

संतापजनक! अ‌ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

महत्वाच्या बातम्या – 

आरोपीला फक्त 10 मिनीट आमच्या ताब्यात द्या; पीडितेच्या मामाची मागणी

आज ती जळाली नाही, समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला- चित्रा वाघ

बॉलिवूड अभिनेत्री कल्की लग्नाआधीच झाली आई

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More