पाटणा | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिंमत दाखवावी, महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सत्तांतर घडू शकतं, असं आवाहन काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी केलं आहे.
बिहार निवडणुकीत भाजपने प्लॅन करुन नितीश कुमार कसे कमकुवत होतील, हे पाहिलं. त्यानुसार त्यांचा प्लॅन यशस्वी झाला. नितीश कुमार यांच्या पक्षाचं बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्व असताना भाजपने आताच्या निवडणुकीत जेडीयूची अवस्था कमजोर केली, अशी टीका तारीक अन्वर यांनी केली आहे.
नितीश कुमार हे पूर्वी एनडीएचे मजबूत नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री होते पण आता भाजप त्यांना भलेही मुख्यमंत्रिपद देईल पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, अशी भविष्यवाणी तारीक अन्वर यांनी केली आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना सर्वत्र लक्ष द्यावं लागतं. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये चांगला प्रचार केला. कपिल सिब्बल यांचं वक्तव्य योग्य नाही, असंही अन्वर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीने कर्णधारपद सोडून जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवावी; माजी खेळाडूची मागणी
‘इमरती देवी जिलेबी बनल्या’; काँग्रेस नेत्याची टीका
चित्रगुप्तानेही पाप-पुण्याचा हिशेब मांडताना महाविकास आघाडीला शाप दिले असतील- राम कदम
“हिंदू सणांवर बंदी हा महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोगाम असेल”
शेवटची ओवाळणी! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळलं