बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीसाठी सलमान सरसावला; खाद्यपदार्थांची चव चाखत घेतला मदतकार्याचा आढावा

मुंबई | अभिनेता सलमान खान याच्या ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, वैद्यकिय कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठई दररोज चहा, नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे.

मुंबईतील भाईजान्स नावाच्या एका हॉटेलमध्ये फ्रंटलाईन वर्कर्ससाठी देण्यात येणारा नाश्ता बनवला जातो. खुद्द सलमान खान यानं फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या नाश्त्याची चव चाखत याचा आढावा घेतला आहे.

सलमानची स्वयंसेवी संस्था आणि ‘आय लव्ह मुंबई’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं मुंबईतील विविध भागांमध्ये जात  Being Haangryy  नामक फूड ट्रकच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात सलमानच्या ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ या संस्थेकडून जवळपास 2 लाख गरजवंतांना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय हजारो मजुरांना सलमाननं आर्थिक मदही देऊ केली होती.

दरम्यान, अनेक कलाकार राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परदेशी गेले असून ते सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मात्र संकटाच्या या काळात अनेकजण मदतीचा हात देत असताना सलमानची ही मदत आणि खुद्द जाऊन मदतकार्याचा आढावा घेणं सर्वांचीच मनं जिंकत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

तारापुरात वायु गळती झाल्याची शक्यता; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

…तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन- दत्तात्रय भरणे

“शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्ही पाळणा हालवणार का?”

अखेर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची बाजी; केन विल्यम्सनची झुंज व्यर्थ

IPL 2021: सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं! ; DC VS SRH

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More