टाटा समूहाला ‘देव’ पावणार? वैष्णोदेवी ते अयोध्येपर्यंत कमाईची ‘भारी’ योजना

TATA Group

TATA Group | 22 जानेवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. अयोध्येत राम मंदिर झाल्यांनतर तेथे गुंतवणूक वाढली आहे. अनेक उद्योगपतींनी तिथे गुंतवणुकीसाठी रस दाखवल्यामुळे अयोध्येतील जागेला भाव आला. देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेला टाटा समूह आता धार्मिक स्थळांच्या माध्यमातून नफा कमावण्याच्या तयारीत आहे.

टाटा समूहाने वैष्णो देवी, अयोध्या आणि तिरुपती या धार्मिक स्थळांवरून कमाईची बंपर योजना बनवली आहे. टाटा समूह हे देशातील अशा व्यवसाय घराण्यांपैकी एक आहे जे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात काम करते. त्यामुळे या समूहाला आगामी काळात देव पावतो का हे पाहण्याजोगे असेल.

टाटा समूहाचा धार्मिक स्थळांवर भर

कारण टाटा समूहाने वैष्णोदेवीसारख्या देशातील मोठ्या धार्मिक आणि अध्यात्मिक ठिकाणांपासून अयोध्या आणि तिरुपतीपर्यंत कमाईची योजना आखली आहे. ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ या टाटा समूहाच्या कंपनीने आता आपले जाळे आणखी विस्तारण्याची योजना आखली आहे. कंपनीचे या क्षेत्रात लीडर बनण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे कंपनीने देशातील विविध धार्मिक स्थळांवर हॉटेल्स सुरू केली आहेत किंबहुना ती सुरू करण्याचे काम सुरू आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड या क्षेत्रातील आघाडीची कंपनी बनेल असा कंपनीला विश्वास आहे. टाटा समूह इंडियन हॉटेल्स ताज, विवांता आणि जिंजर या ब्रँड नावाने देशभरात हॉटेल व्यवसाय करत आहे. इंडियन हॉटेल्सचे एमडी आणि सीईओ पुनीत चटवाल ​​यांनी सांगितले की, टाटा समूहाची हॉटेल्स आता देशभरातील 50 हून अधिक धार्मिक स्थळांवर आहेत. येत्या काही वर्षांत त्यांची संख्या 66 पर्यंत वाढेल.

TATA Group ची नवीन योजना

तसेच कंपनीची हॉटेल्स वैष्णोदेवीपासून तिरुपती बालाजीपर्यंत सुरू झाली आहेत. कंपनी अयोध्येसारख्या नव्याने विकसित होणाऱ्या धार्मिक स्थळावर आणि पर्यटन क्षेत्रातही आपला हॉटेल व्यवसाय विस्तारत आहे. कंपनीने अयोध्येसाठी 3 करार केले आहेत, त्यापैकी एक हॉटेल वर्षभरात चालू होईल. त्यानंतर उर्वरित दोन सुरू होतील.

पुनीत चटवाल यांनी आणखी सांगितले की, मला वाटते की, जगभरात आध्यात्मिक स्थळे आणि अध्यात्म अधिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत याचा आम्हाला आनंद आहे. धार्मिक स्थळे पर्यटन आणि आदरातिथ्याच्या दृष्टीनेही एक सुरक्षित पर्याय आहे कारण लोक चांगल्या किंवा वाईट काळात देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

News Title- Tata Group is prioritizing religious places for investment and will open hotels at Vaishno Devi, Ayodhya
महत्त्वाच्या बातम्या –

OUT अन् 20 मिनिटांनी NOT OUT; रहाणेसोबत काय घडलं? प्रथमच झालं असं, कोचनं मागितली माफी

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

अखेर विराट कोहलीच्या अनुपस्थितीचं कारण आलं समोर; ‘विरुष्का’बद्दल मोठी अपडेट

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .