बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी ‘इतक्या’ हजार फ्रेशर्सला देणार नोकरी!

मुंबई | टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं यंदाच्या आर्थिक वर्षात 40 हजाराहून अधिक फ्रेशर्सना महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या माध्यमातून नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचं संकट असतानाही नवे कर्मचारी दाखल करुन घेण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही. गेल्या वर्षी कर्मचारी भरती प्रक्रियेत एकूण 3 लाख 60 हजार फ्रेशर्सनं नशीब आजमावलं होतं. यात गेल्यावर्षी देखील कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजाराहून अधिक जणांना नोकरीची संधी देण्यात आली होती. यंदाही याच प्रमाणात संधी दिली जाईल, असं कंपनीच्या ग्लोबल ह्यूमन रिसोर्स चीफ मिलिंद लक्कड म्हणाले.

कंपनीला एखादं प्रोजेक्ट मिळाल्यानंतरच भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं काही नाही. नोकरी देण्याची एकंदर प्रक्रियाच खूप वेळकाढू असते. एखाद्याला नोकरी देण्यास त्याला किमान तीन महिने लागतात, असंही त्यांनी सांगितलं.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या 5 लाखांहून अधिक आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीनं 40 हजार फ्रेशर्सना संधी दिली होती. कंपनीच्या ग्लोबल ह्यूमन रिसोर्स चीफ मिलिंद लक्कड यांनी यंदा कंपनीकडून जास्तीत जास्त नोकरभरती केली जाईल असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, पण ‘हे’ प्रकल्प वेगाने पूर्ण करा- उद्धव ठाकरे

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार? पालकमंत्र्यांचं सूचक विधान

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

वडेट्टीवार चंद्रपूरमधील बार-मालकांसाठी बनले ‘देवमाणूस’; दारूबंदी उठवल्यानंतर वडेट्टीवारांची पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More