रतन टाटांच्या ‘या’ कारने घातला होता बाजारात धुमाकूळ; किंमत फक्त…

Ratan Tata l टाटा समूहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे वाहन क्षेत्रातील योगदान कधीही विसरता येणार नाही. देशातील पहिली स्वदेशी कार सादर करणे असो किंवा जगातील सर्वात स्वस्त कार, नॅनो. रतन टाटा हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी भारतात पहिली कार लाँच केली होती.

टाटा इंडिका या कारची किंमत किती? :

पहिली डिझेल हॅचबॅक कार टाटा इंडिका ही टाटा मोटर्सने सादर केली होती, जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली होती. हीच कार होती ज्याला स्वदेशी कार ही पदवी देखील मिळाली होती. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, लाँचच्या वेळी म्हणजेच 1998 मध्ये ही कार केवळ 2.6 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत आणली गेली होती.

ही कार लाँच होताच भारतीय बाजारपेठेत खळबळ उडाली होती. ही कार कोणत्याही भारतीय कंपनीने डिझाइन केलेली सर्वात आधुनिक कार होती. ही कार लाँच केल्याच्या एका आठवड्यात कंपनीला 1 लाख 15 हजार युनिट्सच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. त्यामुळे टाटा इंडिका तिच्या सेगमेंटमध्ये नंबर वन कार बनली होती.

Ratan Tata l या कार सोबत केली स्पर्धा :

टाटा इंडिका या कारने मारुती 800, मारुती झेन सारख्या कारशी स्पर्धा केली आहे. तसेच ही कार डिझेल व्हेरियंटमध्ये लाँच केल्यामुळे लोक अधिक खूश झाले. कारण त्यावेळी डिझेल इंधनाची किंमत खूपच कमी होती. टाटा इंडिकाच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, इंडिका प्रति लिटर सुमारे 20 किलोमीटर मायलेज देत होती.

जेव्हा पहिली इंडिका कार बनवली त्यावेळी रतन टाटा यांनी सांगितले होते की, टाटा इंडिकाला डिझेल कारचे मायलेज आणि इंटीरियर हिंदुस्थान ॲम्बेसेडरइतके मोठे मिळणे अपेक्षित होते, त्यानंतर दावा केल्याप्रमाणे इंडिका प्रत्येक बाबतीत बरोबर असल्याचे सिद्ध झाले अशी माहिती त्यांनी दिली होती.

News Title : Tata Indica Car Launching Story

महत्वाच्या बातम्या –

रतन टाटांचं बॉलिवूडशी खास नातं; मात्र झाले ‘इतक्या’ करोडोंचे नुकसान

‘या’ महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता जमा!

..म्हणून रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही; वाचा त्यांची LOVE Story

रतन टाटा यांची एकूण संपत्ती किती?, उत्पन्नातील मोठा हिस्सा दानमध्येच दिला

सर रतन टाटा यांचे 10 प्रेरणादायी विचार, एकदा वाचाच!