भारतात टाटा कंपनी मागील दोन दशकांपासून कार निर्मितीचा व्यवसाय करत आहे. टाटा एक स्वदेशी कंपनी असून तिच्या वाहनांच्या मजबूत रचनेसाठी आणि सुरक्षिततेसाठी ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहे. आत्मनिर्भर भारतावर जोर देत लोकांकडून टाटाच्या गाड्यांना चांगलीच पसंती मिळत आहे.
ह्या कंपनीने आपल्या गाड्यांमध्ये बरेच आधुनिक बदल केलेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक आकर्षक आणि वैशिष्ट्ये पुर्ण वाहनांची निर्मिती करत आहे. आता टाटा कंपनी ग्राहकांना गाडी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलत देतेय.
मागील वर्षी जानेवारी महिन्यात टाटाने अल्ट्रोज प्रिमियम हॅचबॅक कार बाजारात आणली. गाडीला ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. वर्षाअखेरीस अल्ट्रोजच्या 21,640 युनिट्सची विक्री झाली. टाटाने अल्ट्रोज मध्ये अधिक चांगले बदल केलेत. बाजारात हॅचबॅक सेगमेंट मध्ये अल्ट्रोजने बऱ्याच गाड्यांना मागे टाकले आहे.
आता टाटा, अल्ट्रोजच्या खरेदीवर मोठी सुट देताय. अल्ट्रोज (एक्स इ डिसेल) वर्जन 80 हजार डाऊनपेमेंट भरुन ग्राहकांना गाडी खरेदी करता येणार आहे. गाडीची एक्स शो रुम किंमत 6.99 लाख रुपये इतकी आहे.
पाच वर्षांसाठी ग्राहकांना 7,99,065 रुपये लोन घेऊन घ्यावे लागणार आहे. यावर 9.8 टक्के व्याज लागू असेल,पाच वर्षांसाठी दरमहा 16,899 इएमआई भरावा लागेल. लोन साठी सात वर्षांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी 13,183 रुपये इएमआई द्यावा लागेल.
ग्राहकांना ह्या गाडीत 1497 सीसीच इंजिन मिळणार असुन 88.77 बीएचपी इतके पाॅवर जनरेट करेल. एक लिटर डिसेल मध्ये गाडीचा 21.11 मायलेज आहे. हया कारमध्ये व्हील कर्वस, पाॅवर विंडो, फ्रंट एंट्री- लाॅक ब्रेकिंग सिस्टम, पॅसेंजर एयरबॅग मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात”
आता मोदींनाच विचारायला हवं खरे मोदी कोण?- छगन भुजबळ
“कधी-कधी वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसची खरी गरज”
सचिन आणि लता मंगेशकर यांचा महाराष्ट्र सरकारला अभिमान वाटला पाहिजे- रामदास आठवले
बिग बाॅस फेम राहुल वैद्य दिशा परमारसोबत बांधणार लगीनगाठ!