बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Tata Motorsच्या सर्वच गाड्यांच्या किंमतीत मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या नव्या किंमती

मुंबई | भारतात सध्याच्या घडीला टाटा उद्योगसमूहाचे (Tata Motors) सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांची लोकप्रियता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्यासोबतच त्यांचा ब्रँड असलेल्या टाटा उद्योगसमूहाचा देखील वाहन उद्योगामध्ये बोलबाला असल्याचं पहायला मिळत आहे. लोक टाटांच्या गाड्यांना सध्या चांगलीच पसंती देत आहेत.(Tata Motors car Price Hike)

वोकल फॉर लोकल या कार्यक्रमानंतर तर अनेकांनी फक्त देशी गाड्या घेण्याचा प्रण केला. अनेकांनी त्यासाठी टाटा उद्योगसमूहाची निवड केली. टाटा सध्या बनवत असलेल्या गाड्या सुरक्षित तसेच चांगल्या गुणवत्तेच्या असल्यानं अनेकांनी हा निर्णय घेतला आणि ते आपल्या निर्णयावर खूश देखील आहेत. काहीजण मात्र अजून टाटा कंपनीची गाडी घेण्याच्या विचारात आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

टाटा उद्योगसमूहाने आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. किंमतीमध्ये ०.९ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ गाडीचे मॉडेल तसेच व्हेरियंटवर अवलंबून असणार आहे. ही वाढलेली किंमत कधीपासून लागू होणार याबाबतही टाटा समूहाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

दिनांक १९ जानेवारीपासून टाटांनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत ही वाढ केली आहे. १९ तारखेआधी गाडी बुक केलेल्या ग्राहकांना ही वाढ द्यावी लागणार नाही, मात्र त्यानंतर गाडी बुक करणाऱ्या ग्राहकांना वाढलेली किंमत द्यावी लागेल. दुसरीकडे ग्राहकांच्या सूचनांनूसार काही गाड्यांच्या किंमतीमध्ये १० हजार रुपयांची सूट देखील टाटांकडून दिली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट, डाॅक्टर म्हणाले…

पुढील 2-3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा सुरु होणार

कोरोनावर कोणती औषधं प्रभावी?; WHOनं दिला मोलाचा सल्ला

बोलण्याची संधी दिली नाही म्हणून महिलेनं केलं ‘हे’ कृत्य, पाहा व्हायरल व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More