बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

TATAच्या ‘या’ कारचा बाजारात धमाका; तोडले विक्रीचे सर्व रेकॉर्ड

नवी दिल्ली। अलीकडे पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेता. लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक कल दिसून येतोय. त्यातही टाटा मोटर्सच्या काही गाड्यांनी विक्रमी विक्री केली आहे. सध्या बाजारात काय तर संपूर्ण भारतात टाटा मोटर्स (TATA Motors)सारखी इतर कोणतीही मोठी कंपनी नाही. जी लोकांना इलेक्ट्रिक कार घेण्यास आकर्षित करेल.

टाटा मोटर्सने (Tata Motors) 2021 च्या तुलनेत यावर्षी कार विक्रीमध्ये सर्वाधिक कमाई केल्याचं दिसून येतंय. ऑगस्ट 2022 मध्ये Tata Nexon आणि Punch या गाड्यांची बंपर विक्री झाली आहे. टाटा मोटर्ससाठी 2022 चा ऑगस्ट महीना लाभदायी ठरलाय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

कंपनीने मागील महिन्यात एकूण 47,166 कारची विक्री केली. ऑगस्ट 2021 फक्त 28,018 कारची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत टाटा कंपनीने या वर्षी 68 टक्क्यांनी अधिक कार विक्री केली आहे. तर Tata Nexon आणि Punch ने तर गेल्या महिन्यात सर्वात जास्त आत्ता पर्यंतची सर्वाधिक कारविक्री केली आहे. आता Tata Nexon, Safari आणि Harrier या कारचे Jet Edition देखील लाँच केले आहेत. यामुळे सणासुदीच्या मुहूर्तावर या कारचीही चांगलीच विक्री होण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्सच्या (Tata Motors) एकूण विक्रीत इलेक्ट्रिक कारही अव्वल ठरत आहे. कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये एकूण 3,845 इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. टाटाच्या इलेक्ट्रिक कारची ही विक्री अशीच सुरू राहीली तर हळुहळु टाटा मोटर्सच्या एकूण विक्रीमध्ये 10 टक्के भाग हा इलेक्ट्रिक कारचा असेल. सध्यातरी भारतात इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये टाटा कंपनी व्यतिरिक्त कोणतीही मोठी कंपनी नाही. जी देशातील अधिकाधिक लोकांना इलेक्ट्रिक कार घेण्यास आकर्षित करेल.

टाटा नेक्झॉन (Tata Nexon) आणि पंचसाठी ऑगस्ट महिना अधिक लाभदायी ठरला. गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही एसयूव्ही कारने आत्तापर्यंतची सर्वात मोठी मासिक विक्री केली आहे. ऑगस्टमध्ये टाटा नेक्झॉन या इलेक्ट्रिक कारचे एकूण 15,085 युनिट विकले गेले होते. तर टाटा पंच या कारचे एकूण 12,006 युनिट विकले आहेत. या दोन गाड्यांव्यतिरीक्त हेरियर, सफारी, अल्ट्रोज, टिगोर आणि टियागो या कारलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटाने काही दिवसांपूर्वीच नेक्झॉन, सफारी आणि हेरियर या गाड्यांचे जेट एडिशनसुद्धा लाँच केले आहेत. जेट एडिशनची डिझाईन आकर्षक असल्याचं पहायला मिळतंय. टाटा हेरियर आणि सफारीमध्ये या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चांगले फिचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये ESP आणि ड्रायव्हर डोस ऑफ अलर्ट पॅनिक ब्रेक अलर्ट आणि आफ्टर इम्पॅक्ट ब्रेक यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. सनासुदीच्या मुहुर्तावर टाटा मोटर्सला अधिकाधिक कमाई करून देण्यासाठी हे जेट एडिशन सज्ज आहे.

Heart Attack | हार्ट अटॅकपासून वाचायचंय?, मग आजच सुरु करा हा जबरदस्त उपाय

…अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More