बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाटा मोटर्सचा नवा धमाका, ‘ही’ गाडी तोडू शकते मार्केटचे सर्व रेकॉर्ड्स…

मुंबई | टाटा मोटर्स कंपनी मजबूत गाड्या बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या भारतात सर्वात टाॅपला असणारी टाटा मोटर्स कंपनी लवकरच आणखी एक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षात बाजारामध्ये मध्यम स्वरूपाच्या गाड्यांची मागणी वाढताना दिसतीय. त्यामुळे आता टाटा मोटर्स एक मिनी एसयुव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.

ग्राहकांची मागणी पाहता आता टाटा मोटर्स ‘टाटा हाॅर्नबील’ ही मिनी एसयुव्ही लाँच करणार आहे. सध्या भारतीय बाजारात टाटा नेक्साॅनची मोठी मागणी आहे. त्यामुळे याच प्रकारची गाडी मध्यम स्वरूपात देण्याचा प्रयत्न सध्या कंपनी करताना दिसतीय. टाटाच्या इतर गाड्याप्रमाणे ही गाडी देखील मजबूत असणार आहे. लवकर कंपनी या गाडीची अधिकृत घोषणा करेल.

टाटा हाॅर्नबील मिनी एसयुव्हीमध्ये 1.2 लीटरचे तीन सिलेंडर इंजिन देण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीला 86 bhp ताकद मिळणार आहे. तर 1.2 टर्बो पेट्रोल इंजिन 110 bhpची ताकद देणार आहे. या गाडीत 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गियरबाॅक्स देण्यात आले आहेत. सध्या टाटाचे एकूण 950 आऊटलेट्स आहेत. आगामी काळात टाटा आणखी 250 आऊटलेट्स उघडण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, कंपनी ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्याच्या तयारीत आहे. कमी व्याजदर आणि कमी डाऊनपेमेंटद्वारे  ग्राहकांना ऑफर देण्याची शक्यता आहे. यासाठी टाटा मोटर्सने बँक ऑफ महाराष्ट्रसोबत डील झाल्याचं देखील समोर आलं होतं. त्यामुळे आता बाजारात येताच ही गाडी धूमाकुळ घालण्याच्या तयारी आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानात चालू विमानातून खाली पडले प्रवासी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

“आम्हाला जेवणाला बोलावलं, पण आमचे हात बांधले”; शरद पवारांची केंद्रावर टीका

देश जळताना राष्ट्रपती भरत होते पैसा, इतका पैसा नेला सोबत!

“…पण अफगाणिस्तानकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता”

मुंबईत कोरोना सेंटरमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा धक्कादायक व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More